सातारा: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी, फलटणजवळील तरडगाव येथे बुधवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासोबत विदीप जाधव प्रवास करत होते. रात्री साडे अकराच्या सुमारास तरडगावच्या पालखी स्थळावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तरडगावमध्ये रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यविधीच्या ठिकाणी पोलीस सलामी देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विदीप जाधव यांच्या निधनाने पोलीस दल, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांनी अखेरपर्यंत अजितदादांची साथ निभावली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY