चिपळूण : गो. नी. दांडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दुर्गमहर्षींना अभिवादन; १२ जुलै रोजी ऐतिहासिक दुर्ग गोविंदगडावर दुर्गभ्रमंती राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट यांच्या वतीने मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक तथा दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांच्या ८ जुलै रोजी झालेल्या जन्मदिनानिमित्त त्यांना अभिवादन म्हणून रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत ऐतिहासिक दुर्ग गोविंदगड येथे दुर्गभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

गो. नी. दांडेकर यांनी आपल्या साहित्य, संशोधन आणि दुर्गभ्रमंतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या दुर्गभ्रमंतीमध्ये गोविंदगडाचा इतिहास, किल्ल्याचे सामरिक महत्त्व, वास्तुरचना तसेच दुर्गसंवर्धनाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी, विद्यार्थी, युवक-युवती आणि सर्व नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

ठिकाण : ऐतिहासिक दुर्ग गोविंदगड, गोवळकोट ,दिनांक : रविवार, दि. १२ जुलै २०२६ ,वेळ : सायंकाळी ४.०० ते ६.००

अधिक माहितीसाठी : मार्तंड माजलेकर : +९१ ७२०८० ७९९३० , मंदार आवले : +९१ ८२३७४ ९७७४२