देवरुख: सुशिक्षित तरुणानी राजकारणात सक्रिय झाले पाहिजे अस बोललं जात परंतु प्रत्यक्षात मात्र तरुणाई राजकारणाचा तिरस्कार करते. परंतु राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करायचं आणि समाजकारण करताना जनकल्याण साधता येते याच प्रामाणिक उद्देशाने मी या क्षेत्रात सक्रिय झाले आहे असे संगमेश्वर तालुक्यातील साडवली पंचायत गणातील सेनेच्या उमेदवार तृप्ती सचिन मांगले यांनी सांगितले.

त्यापुढे म्हणाल्या की,शासन प्रशासनात चांगली भूमिका वठवली पाहिजे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात रुची दाखवली पाहिजे अस माझं मत आहे. सचिन सुभाष मांगले हे या विभागात शिवसेनेचे काम करतात. त्यांनी अनेक विकासाची कामे साडवली जिल्हा परिषद गटात केली आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निधीतून साडवली MIDC लगतच्या वाड्यामधील रस्ते कामांना पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी २० कोटी पंचवीस लाख निधी मंजूर केला आहे.

कासारवाडी पार ते बाळेकुंद्री घर नेदरवाडी रस्ता मंजूर मजबूतीकरण ,संगमेश्वर मुख्य रस्ता ते नेदरवाडी साईमंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे आदी विविध कामे केली असून तरुणांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री मा. उदय सामंत , आमदार किरण भैय्या सामंत यांच्या सहकायनि आपल्या साडवली जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत. आमदार शेखर निकम यांनी गटामध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीने अनेक विकास कामे मंजूर करून आणली आहेत, या सर्व विकास कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. साडवली पंचायत समिती गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मला काम करायचे आहे असे तृप्ती सचिन मांगले यांनी स्पष्ट केले.रोजगाराचे प्रश्न, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, आरोग्य विषयक सुविधांचे प्रश्न, शिक्षण विषयक प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, वीज पुरवठा प्रश्न इ. या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY