पेण(प्रशांत पोतदार) : आदिवासी समाजाच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले आहे. पेण येथे आदिवासी विकास विभागाकडून आयोजित सातव्या आदिवासी विकास परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आदिवासी समाज भवन निर्माण करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, सुधागड तालुक्यातील पंचवीस एकर जागेची निवड केली आहे आणि यासाठी १०० कोटींचा बजेट मांडला आहे.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले की, आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास आहे. त्यांनी समाजबांधवांना चांगले शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे असे आवाहन केले.

या परिषदेत आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी ठराव करण्यात आले. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे.खारभूमी विकास रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विक्रमगड येथील आदिवासी समाजाचे स्थळांतर थांबविण्यासाठी रोजगार हमीची कामे व फुलशेती मच्छपालन यासाठी चालना देत आदिवासीना गावातच रोजगार निर्मिती मिळाली त्यामुळे स्थळातर थांबल्याचे सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचीही भाषणे झाली..
रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे सर्व नृत्य प्रकार करणारे आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत अवतरले होते.