कल्याण : कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण येथील एसीपी कार्यालयात साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली. अचानक नाग कार्यालयात दिसताच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

कार्यालयात काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. जवळपास अर्धा तास त्या खोलीतच थांबून राहिल्या.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्पमित्र सतीश बोबडे यांनी कौशल्याने इंडियन कोब्राला पकडले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH