मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 135 वी जयंती साजरी होत असून राज्य शासनातर्फे भिमजयंतीच्या केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल येथे आयोजित शासकिय बैठकीत घेतला. यावेळी पोलीस, रेल्वे पोलीस, मुंबई महापालिका, राज्य शासनाच्या समाज कल्याण विविध विभांगाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुज्य भंते डॉ. राहुलबोधी महाथेरो, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, समन्वय समितीचे नागसेन कांबळे, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, राजेंद्र जाधव ; प्रकाश मोरे, दयाल बहादुरे, सुरेश बारसिंग, उषाताई रामलु, कामगार नेते रमेश जाधव, प्रकाश जाधव, शिवसेनेचे नेते रवि गरुड, रिपाइंचे घनश्याम चिरणकर आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमीत्त मुंबईत चैत्यभूमी येथे, नागपुरमधील दिक्षाभुमी यासह राज्यभरांतील विविध स्मारकात राज्य शासनातर्फे पुरविण्यात येणा-या विविध सेवा सुविधा आणि सुरक्षेच्या तयारीचा ना. रामदास आठवले यांनी आढावा घेतला. मुंबईत चैत्यभूमी तसेच गोराई येथील पॅगोडा येथे भिमजयंती निमीत्त हजारो बौध्द उपासक, भिम अनुयायी भेट देतात. त्यांच्या सुरक्षेचा विविध सुख सुविधा पुरविण्याबाबत ना. रामदास आठवले यांनी माहिती घेतली. 14 एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात नामवंत कलाकारांसह आंबेडकरी चळवळीतील भिमशाहीरांनाही आंबेडकरी लोक कलावंताना संधी देण्याची सुचना करण्यात आली. तसेच भिमजयंती निमीत्त चैत्यभूमी येथे 14 आणि 15 एप्रिल रोजी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी राज्य शासनातर्फे देण्यात यावी. याबाबत आपण जिल्हाधिका-यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
