मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करत आहेत. एपस्टीन फाईलमध्ये ज्या प्रकारे पंतप्रधानांचे नाव आल्याचा आरोप होत आहे, तो प्रकार देशासाठी घातक असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
देशासमोर बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न यांसारखे अनेक गंभीर प्रश्न असताना, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एपस्टीन फाईलमधील प्रकरणामुळे देशाची बदनामी होत असून हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने सुरू ठेवण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.