चिपळूण: येथील नगरसेविका सौ अंजली सतीश कदम यांनी नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ग्रॅव्हिटी पाणी योजना, महिलांचे प्रश्न आणि प्रभाग नऊ मधील रहिवाशांच्या समस्या मांडल्या.
पालिका सभेत सौ. कदम यांनी शहरासाठी होणाऱ्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसंदर्भात या योजनेचे काम किती टक्के पूर्ण झाले आहे? आणि पाच टक्के वाढीव दराने टेंडर का देण्यात आले? त्याशिवाय योजनेचा दहा टक्के निधी पालिकेने उभारावयाचा असून त्याची तरतूद पालिकेने कशा पद्धतीने केली आहे तसेच या योजनेसाठी उभारण्यात येणाऱ्या टाकी करिता जमीन खरेदीखताचे काय झाले असे अनेक प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला भंडावून सोडले.
शहरातील महिलांसाठी प्रत्येक प्रभागात जिमची स्थापना करताना सेफ्टी, प्रायव्हसी यांचा विचार होणे गरजेचे आहे याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्यावरही त्यांनी मत मांडले. कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणाऱ्या डाटा ऑपरेटर्सच्या कामाच्या मूल्यमापनासाठी काही यंत्रणा आहे का असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला.
प्रभाग नऊ मधील सीएनजी गॅस पंपचा रहिवाशांना होणारा त्रास, संतोषी माता मंदिराकडे जाणारी संरक्षण भिंत आणि बाहेरून येणारे फेरीवाले या प्रश्नांकडेही त्यांनी प्रशासनाने लक्ष वेधत ठोस उपाययोजना करण्याची सूचना केली.
सौ कदम यांनी पहिल्याच कौन्सिल मध्ये आपल्या कामाची चुणूक दाखवून दिल्यामुळे प्रभागातील आणि शहरातील जनतेने समाधान व्यक्त केले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
