चिपळूण: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याबाबत केलेल्या विधानाचा चिपळूण शहर आणि ग्रामीण भाजपातर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक चिंचनाका येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, मुर्दाबाद मुर्दाबाद टिपू सुलतान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद सपकाळ मुर्दाबाद या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.

या आंदोलनाला उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे तसेच चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हनकर, शहर मंडल अध्यक्ष श्री शशिकांत मोदी, शहर सरचिटणीस सौ सारिका भावे, सरचिटणीस विनायक वरवडेकर,युवा अध्यक्ष शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, नगरसेविका अंजली कदम, नगरसेविका शितल रानडे, रत्नदीप देवळेकर, रुही खेडेकर, अभिषेक राजापूरकर, साहिल ताम्हणनकर, स्वाती देवळेकर, कुणाल आंबेकर,नरेंद्र बेलवलकर, प्रणिता घाडगे माधुरी शिंदे , प्रणय वाडकर, महेश कांबळे प्रीतम इंगवले ,निशा कोलगे,अमेय सुर्वे , सुदेश जाधव , दिपक शिंदे, महेश शिंदे , प्रतीक गोरिवले, दिनेश अपिष्टे, मंदार ठासले, विनय दाते , परेश मोरे , राकेश भुरण, संदीप कोलगे, गणपत शिंदे , गोपीनाथ शिंदे , अभिषेक जागुष्टे, स्वाती पटवर्धन,स्वानंद रानडे, पूजा कदम,विलास चव्हाण, निनाद आवटे, प्राजक्ता टाकळे, जनार्दन पवार आदी उपस्थित होते.