चिपळूण (प्रतिनिधी) शहरालगतच्या कापसाळ फणसवाडी येथे आढळून आलेल्या भल्या मोठ्या मगरीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडल्यामुळे वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री १:३० वाजता मौजे कापसाळ पैकी फणसवाडी येथे लोकवस्तीमध्ये मगर आढळून आल्यान तेथील रहिवासी श्री नागेश कांबळी यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. या माहितीवरून घटनास्थळी श्री.एस एस सावंत,वनपाल चिपळूण , श्री.राहुल गुंठे वनरक्षक रामपूर, वाहन चालक श्री. नंदकुमार कदम, श्री. प्रणित कलकुटकी, श्री.अजय बडदे आदी कर्मचाऱ्यांचे पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने मगरीची पाहणी केली असता सदरची मगर ही पूर्ण वाढ झालेली ८.५ फूट लांबीची असल्याचे दिसून आले. त्यानंतर मगरीस सुरक्षितरित्या रेस्क्यू करून ताब्यात घेतले. वरिष्ठांच्या आदेशानुसार मगरीस नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सदरचे बचाव कार्य हे .सौ.गिरीजा देसाई पाटील, विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण), प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण), .श्री. एस एस खान, वन परिक्षेत्र आधिकारी चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पडले. वन कर्मचाऱ्यांना फणसवाडी येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY