चिपळूण : गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आता ग्रामीण पातळीवर गिरणी कामगारांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. १४ कामगार संघटना एकत्र आलेल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे प्रमुखनेते, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या अध्यक्षते खाली परळ येथे सभा होऊन १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनावर गिरणी कामगारांचे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याप्रमाणे लढा समितीचे निमंत्रक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची कोल्हापूर येथे गिरणी कामगारांची सभा होऊन गिरणी कामगारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
येत्या १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी,सकाळी 11 वाजता चिपळूण,चिंच नाका,येथील आंबेडकर हॉलवर गिरणी कामगारांची सभा होणार आहे.तरी या सभेला खेड, मंडणगड, दापोली, संगमेश्वर येथील गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थि त राहावे,असे आवा हन कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.
चिपळूण येथील प्रचार सभा लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरील ‌ लढा यशस्वी करण्यासाठी,ग्रामीण पातळीवरील सभाना गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक आणि राष्ट्रीय मतदार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सर्व पदाधि काऱ्यांची आज मजदूर मंझील मध्ये तातडीची बैठक होऊन, गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरील लढा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.या बैठकीला खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, साई निकम, सुरेश मोरे आदी उपस्थित होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY