अलिबाग : जय जय जय भवानी, जय जय जय शिवाजीच्या
जयघोषात… ढोल ताशांच्या गजरात…, मर्दानी खेळांच्या संगतीने…, भगवे झेंडे फडकावीत… अशा उस्ताहपूर्ण वातावरणात अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथे शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शुक्रवारी (दि.६) साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यातील हेमनगर गावात तसेच परिसरात भव्य मितक्रवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीचे आयोजन शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
शिवजयंती निमित्त हेमनगर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थींनी लक्ष वेधून घेत होत्या. ही मिरवणूक हेमनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सुरू करण्यात आली. मिरवणुकीत जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्या रसिका केणी, अलिबाग पंचायत समिती सदस्या भाग्यता पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका संजीवनी नाईक यांच्यासह शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी, हेमनगर ग्रामस्थ सहभागी झाले होते. शिवजयंती निमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर तर्फे दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
