मुरुड : काशिद-चिकणी मुख्यः रस्त्याला रात्री साडेदहाचे सुमारास भिषण अपघात नवीन रस्ताच्या मोरी बांधकामाच्या खड्डात मोटरसायकलस्वार पडून वनरक्षक सुरज सांरगे यांच्या दुर्देवी अपघाती मुत्यू रेवदंडा-महेंद्र खैरे-पाच दिवसापुर्वी जुळे अपत्याचा लाभ होवून आनंदात असलेले अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे कार्यरत असलेले वनरक्ष्ज्ञक सुरज सारंगे मुरूड तालुक्यातील सर्वे येथील निवासस्थानी काल रात्रीचे साडेदहाचे सुमारास दुचाकी वाहनाने जात असताना, नवीन रस्तासाठी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या मोरी बांधकामाच्या खड्डात मोटरसायकल पडून मोटरसायकल स्वार वनरक्षक सुरज सारंगे यांच्या दुर्देवी मुत्यू झाला.
याबाबत वनरक्षक व वनपाल संघटनेचे अध्यक्ष मयुरेश तायडे सदर नवीन मोरी बांधकामाचे ठिकाणी योग्य बॅरिकेट्स, सुचना फलक, रात्री स्पष्ट दिवसण्यासाठी रेडियम पट्टया,किंवा लाल दिवे नसल्याने दिसून येत असल्याचे म्हणून ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने हा अपघात घडला असून नाहक एक उमदया तरून वनरक्षक सुरज सारंगे याच्या दुर्दैवाने या अपघातात मृत्यू झाला आहे, पाच दिवसापुर्वीच दोन जुळे अपत्याचा बाप झालेल्या वनरक्षक सुरज सारंगे यांच्या दुर्देवी मृत्यूबाबत सर्व थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत संबंधीत प्राधिकरण व कंत्रादारांच्या विरोधात महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटना, शाखा अलिबागचे अध्यक्ष मयुरेश तावडे, व पदाधिकारी यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार संबधीतावर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रकाव्दारे केली आहे.
मुरूड तालुक्यात सर्वे येथे निवासस्थानी रात्री साडेदहाचे सुमारास मार्गक्रमाण करत असताना, सर्वे नजीक चिकणी जवळील नुतन मोरी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डात मोटर सायकलचा तोल जावून खोल खड्डात मोटरसायकलसह पडून वनरक्षक सुरज सारंगे यांच्या दुर्देवी अपघाती जागीच मुत्यू झाला. काही दिवसांपुर्वीच वनरक्षक सुरज सारंगे यांना जुळे अपत्याचा लाभ झाला आहे, ही दोन्ही बालके रूग्णालयातून त्यांचे सर्वे येथील निवासस्थानी आली होती. याबाबत आनंदाचा क्षण त्यांनी मोबाईलवर स्टेटस्‌‍ ठेवून व्यक्त केला होता. मात्र आनंदाच्या वातावरणात असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातल्याने ही दुर्देवी घटना घडली असून वनविभागात शोककळा पसरली आहे.
दरम्यान रेवस-रेड्डी मार्गातील कामादरम्यान खोदून ठेवलेल्या खड्डयाजवळ आवश्यक सुरक्षेची उपाय योजना करण्यात आलेली नव्हती, याबाबत तिव्र नापंसती व्यक्त करण्यात येत आहे.