नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. गरीब, वंचित, सामान्य नागरिक आणि शेतकरी या घटकांवर लक्ष केंद्रित करणारा आणि पायाभूत सुविधांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले असले तरी अर्थसंकल्प सादर होत असतानाच शेअर बाजार गडगडायला लागला.

या अर्थसंकल्पाची काय वैशिष्ट्ये आहेत.. अर्थसंकल्पामुळे काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार.. जाणून घेऊया सविस्तर माहितीसह…

भारतीय मासेमारी जहाजांनी खोल समुद्रात पकडलेलं मत्स्यउत्पादन करमुक्त

गंभीर आजारांवरीलची औषधे ही स्वस्त होणार

कॅन्सरवरची 17 औषधांच्या किंमती कमी होणार

३१ ऑगस्टपर्यंत आयकर भरता येणार

मायक्रोवेव्ह-ओव्हनमध्ये वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट पार्ट्सवर मूलभूत सीमाशुल्क सूट

फ्युचर ट्रेडिंग वरती STT 0.03 वरून 0.05

निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील महत्त्वाच्या घोषणा…

  • तीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन केल्या जातील
  • जामनगरमध्ये आयुर्वेद संशोधन केंद्र उभारणार
  • प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव
  • कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल
  • हे साधन भारत व्हिस्टा या नावाने वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असेल.

ऑरेंज इकॉनॉमीसाठी अर्थमंत्र्यांच्या घोषणा:

  • गेमिंग आणि कंटेंट क्षेत्रांच्या वाढीवर भर दिला जाईल
  • २०३० पर्यंत २० लाख व्यावसायिक संधी निर्माण केले जातील
  • १५,००० माध्यमिक शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जातील

ऑरेंज इकॉनॉमी किंवा क्रिएटिव्ह इकॉनॉमी म्हणजे वैयक्तिक सर्जनशीलता, कौशल्ये आणि बौद्धिक संपत्तीवर आधारित क्षेत्रे आहेत, ज्यात कला, डिझाइन, फॅशन, चित्रपट, संगीत आणि डिजिटल कंटेंट यांचा समावेश आहे.

बाहेरच्या देशात सीफूड निर्यात करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते. यासाठी लागणारे काही साहित्य बाहेरून आयात करताना आता ३ टक्क्यांपर्यंत मालावर कोणताही टॅक्स (ड्युटी) भरावा लागणार नाही. आधी ही मर्यादा फक्त १ टक्का होती.

चामड्याच्या वस्तूंची निर्यात वाढवण्यासाठी, त्या तयार करण्यासाठी लागणारे ठराविक साहित्य बाहेरच्या देशातून विनाशुल्क (Free) आयात करण्याची परवानगी दिली जाईल.

मोठ्या बॅटरी साठवणूक यंत्रणा (Battery Energy Storage Systems) तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री (Capital Goods) बाहेरून मागवताना त्यावर लागणारा ‘बेसिक कस्टम ड्युटी’ टॅक्स माफ करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

चामड्याच्या निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या विशिष्ट साहित्याच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

फ्युचर ट्रेडिंग वर STT वाढवून 0.05% करणार

अपघात विम्यावर कोणताही टॅक्स नाही

पुढील वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या ४.३ टक्के राहणार

नवीन कर प्रणाली अन्वये सहकारी संस्थांदरम्यानच्या लाभांश उत्पन्नावर कर वजावटीची परवानगी

आयकर कायदा अधिक तर्कसंगत करण्याचा प्रस्ताव

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून महाराष्ट्रासाठी मोठं गिफ्ट, दोन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करणार

महाराष्ट्रात दोन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे-हैद्राबाद प्रवास सुसाट होणार आहे. देशभरात सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत. त्यातले दोन महाराष्ट्रात आहेत. यात मुंबई-पुणे आणि पुणे हैद्राबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा समावेश आहे. या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई-पुणे-हैदराबाद प्रवासाचा वेळ अत्यंत कमी होणार आहे.

ऑडिटला पात्र नसलेले व्यवसाय, ट्रस्टना रिटर्न दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत वेळ

आर्थिक वर्ष 2026 मध्ये खर्चाचा सुधारित अंदाज 49.6 लाख कोटी

आर्थिक वर्ष 2027 साठी 53.5 लाख कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज

आर्थिक वर्ष 2027 मध्ये निव्वळ कर उत्पन्न 28.7 लाख कोटी राहिल असा अंदाज

केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा…

अपघात विमा करमुक्त असणार, 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार..

सुधारित अंदाजानुसार 2025-26 च्या वर्षातली राजकोषीय तूट जीडीपीच्या 4.4% असल्याचा अंदाज

2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज आणि जीडीपी गुणोत्तर जीडीपीच्या 55.6 % राहण्याचा अंदाज 2025-26 च्या आर्थिक वर्षात ते 56.1% होतं

पर्यटनासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा…

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी या संस्थेची स्थापन केली जाईल.

२० लोकप्रिय पर्यटन स्थळांवर १०,००० मार्गदर्शकांचे कौशल्य वाढवण्याची योजना सुरू केली जाईल.

राष्ट्रीय डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रीड स्थापन केला जाईल.

जागतिक ट्रेकिंग आणि हायकिंग:हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि अराकू व्हॅलीमध्ये पर्वतीय ट्रेल्स बांधले जातील. ओडिशा, कर्नाटक आणि केरळमध्ये कासवांसाठी ट्रेल्स विकसित केले जातील.

  • धोलावीरा सारख्या १५ पुरातत्वीय स्थळांना सांस्कृतिक स्थळे म्हणून विकसित केले जाईल.

औद्योगिक समूह – पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी योजना विकसित करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2027 साठी राज्यांना वित्त आयोग अनुदान म्हणून 1 लाख 40 हजार कोटी रुपये प्रदान करणार

पूर्वेकडील राज्यातील 5 पर्यटन केंद्रांचा विकास करणार

जिल्हा रुग्णालयांची क्षमता वाढवण्यावर भर देणार

समुदायिक मालकी तत्वावर किरकोळ विक्री स्वयं-मदत उद्योजक केद्रांची स्थापना करणार

भारतीय काजू आणि कोको पिकासाठी योजना प्रस्तावित

किनारी भागात नारळ, चंदन, काजू यासारख्या उच्च-मूल्याच्या पिकांना उत्तेजन

किनारी भागात मत्स्यव्यवसाय साखळी मजबूत करण्यावर भर देणार

किनारी भागात नारण, चंदन आणि काजूच्या उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार

चंदनाच्या उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष देणार

प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार, मुलींसाठी अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा

जागतिक दर्जाची ट्रेकिंग आणि हायकिंग स्थळं उपलब्ध करून देण्याची भारताची क्षमता

भारतातील पर्यटन स्थळांवरील मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना प्रस्तावित

छोट्या शेतकऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रीत करणार

येत्या दशकभरात क्रीडा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी खेलो इंडिया मिशन हाती घेणार

ऐतिहासिक महत्त्व असलेली पुरातत्व विभागाची १५ ठिकाणे विकसित केली जाणार

देशात 3 अखिल बारतीय आयुर्वेद संस्था उभारणार

गेल्या 10 वर्षांत 25 कोटींहून अधिक लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत.

शिक्षण ते रोजगाराचा आढावा घेण्यासाठी एका समितीचे गठन होणार

AI चा सेवा क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा समिती अभ्यास करणार

वाराणसी, पाटना येथे अंतर्देशीय जलमार्गांना सेवा देणारी जहाज दुरुस्ती संस्था स्थापन केली जाणार

पुढील पाच वर्षांत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित करणार

इन्फ्रा रिस्क गॅरंटी फंड स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

आर्थिक वर्ष 2027 मध्ये भांडवली खर्च 12 लाख 20 हजार कोटी निश्चित केला आहे.

खादी उत्पादन महात्मा गांधी ग्रामस्वराज्य योजनेचा प्रस्ताव

दुय्यम आणि तिसऱ्या स्तरावरच्या शहरांत पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणार

‘कॉर्पोरेट मित्र’ योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी सरकार मॉड्यूलर अभ्यासक्रम तयार करण्यास मदत करेल.

सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी स्वावलंबी भारत निधीत दोन हजार कोटींची तरतूद

भविष्यात मेगा टेक्सटाइल्स पार्क स्थापन करणार

दोनशे पारंपरिक उद्योग समूहांना पुनरुज्जीवित करण्यासाठी योजना सुरू करणार

जागतिक स्तरावर स्पर्धात्मक क्रीडा साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम प्रस्तावित

वस्त्रोद्योग क्षेत्रात कौशल्य वाढवण्यासाठी ‘समर्थ २.०’ चे लक्ष्य

आव्हानात्मक स्थितीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्याचा प्रस्ताव

वस्त्रोद्योग क्लस्टर्सचं आधुनिकीकरण करण्यासाठी वस्त्रोद्योग विस्तार आणि रोजगार योजना प्रस्तावित

५ वर्षांच्या कालावधीत १०,००० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह कंटेनर निर्मितीसाठी योजना प्रस्तावित

सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी ४० हजार कोटी रूपये…

मधुमेह आणि कॅन्सरवरील औषधं स्वस्त केली जाणार – निर्मला सीतारमण

भारताला बायोफार्माचे हब बनविणार…

सरकारडून ३५० हून अधिक आर्थिक सुधारण्या करण्यात आल्या

सुधार एक्सप्रेस – रोजगार वाढविण्यासाठी आणि विकास वाढविण्यासाठी सरकारकडून अनेक आर्थिक दुरुस्ती

उत्पादकता आणि प्रतिस्पर्धा वाढवणे हे मुख्य ध्येय… – निर्मला सीतारमण
हा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी, नोकरदार, उद्योगजगत स्टार्ट्सअप क्षेत्रांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻

🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY