खालापूर (राकेश खराडे) : “जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी” दक्षिणपिठ – नाणीजधाम महाराष्ट्र यांचा पादुका दर्शन सोहळा शुक्रवार , दिनांक : १३ मार्च २०२६ रोजी, सकाळी १०:०० पासुन एस पी मैदान, मुक्काम: ताकई, धाकटी पंढरी, ता. खालापूर येथे आयोजित करण्यात आला आहे,
या शुभदिनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांसमवेत गुरुपुजनाचा, उपासक दिक्षेचा, प्रवचनाचा व जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना व हितचिंतकांना मिळणार आहे. या दिवशी कार्यक्रम ठिकाणी हजारो हितचिंतक भक्त/बालक/उपासक दीक्षा घेणार आहेत.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल, मानवी मनाचा विकास कसा साध्य होईल, तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यावर ज.न म. प्रवचनकार यांच्या माध्यमातून उद्धबोधक प्रवचन करण्यात येणार आहे.
या भव्य दिव्य अशा पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात जगदद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकां समवेत भव्य दिव्य अशा शोभा यात्रेच्या माध्यमातून, विविध नयनरम्य कला पथकांच्या उपस्थितीत कार्यक्रम स्थळी होणार आहे.
तसेच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत रायगड जिल्यातील शाळांना कार्यक्रम स्थळी मोफत कपाट वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून गुरुपुजनचा, प्रवचनाचा, दर्शनाचा व पुष्पवृष्ठीचा लाभ घ्यावा असे आवाहन रामानंद संप्रदाय, जिल्हा सेवा समिती – उत्तर रायगड यांनी केले आहे.