खेड: येथील नगराध्यक्षा सौ.माधवी बुटाला यांनी शहरातील विविध विकास कामांसंदर्भात गृहराज्यमंत्री श्री योगेशदादा कदम यांची मुबंईत सुनिती बिल्डिंग या कार्यालयात भेट घेतली.

यावेळी उपनगराध्यक्ष श्री. सतिश उर्फ पप्पू चिकणे, शहरप्रमुख श्री. कुंदन जी सातपुते, बांधकाम सभापती. श्री. सुनिल दरेकर, आरोग्य स्वछता सभापती तोसिफ खोत आदी उपस्थित होते.
खेड शहर हद्दवाढ, रस्ते अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण निधी, नवीन फायर फायटर खरेदी , ६ हजार लिटरचा पाणी टँन्कर खरेदी , नवीन जेसीबी खरेदी अशा मागण्यांचे निवेदन यावेळी ना.कदम यांना देण्यात आले.
खेडच्या विकासासाठी आपण भरीव योगदान देऊ आणि नगरपालिकेला सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही ना.कदम यांनी पालिकेच्या शिष्टमंडळाला दिली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH