खोपोली :शहरातील एका शिक्षण मंडळाच्या कथित गैरव्यवहाराबाबत भारतीय जनता पक्षाने आज सोमवारी संस्थेच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.मात्र जमावबंदीचा आदेश असल्याने हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खोपोलीत महाराजा मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भाजप नेते यशवंत साबळे यांनी संस्थेत असलेल्या अनेक गैरव्यवहाराची अनेक उदाहरणे सांगून याबाबत शासनाने हस्तक्षेप करावे अशी मागणी केली.त्यांनी यावेळी अनेक आरोपानबाबत लेखी पुरावेच पत्रकार परिषदेत सांगितले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनीही प्रसारमाध्यमांची बोलताना यशवंत साबळे यांच्या आरोपाबाबत आपण विधानसभेत विचारणा करणार असल्याचे सांगितले.
यशवंत साबळे यांच्या आरोपात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असतानाही न्याय मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत आपण वरिष्ठ पातळीवर न्याय मागणार असल्याचे पण त्यांनी सांगितले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻