रायगड ( मनोज खांबे ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज ऐतिहासिक किल्ले रायगड येथे सशस्त्र पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९८ व्या जयंती निमित्त हा शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवजयंतीनिमित्त आज सकाळी किल्ले रायगडावर शासकीय मानवंदना सोहळा पार पडला. रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास सशस्त्र सलामी देण्यात आली. वाद्यवृंदाच्या गजरात आणि शिस्तबद्ध संचलनात पोलिसांनी मानवंदना सादर केली.
या कार्यक्रमास महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाची उजळणी केली. शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि प्रशासनकौशल्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. देशभक्तीच्या घोषणांनी आणि वाद्यवृंदाच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
हा मानवंदना सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि गौरवशाली वातावरणात संपन्न झाला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY