चिपळूण (प्रतिनिधी):- बदलत्या काळात केवळ पदवी पुरेशी नाही, तर तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे, हे कोकणच्या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. नॅशनल कन्नड एज्युकेशन सोसायटीच्या सर एम. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज & रिसर्च तसेच SVIMS Business School मध्ये शिक्षण घेणाऱ्या गौरव संतोष सावर्डेकर (मूळ रा. काडवली-खेड, सध्या शिक्षण- वडाळा मुंबई) या विद्यार्थ्याने ‘आयआयएम’ (IIM) मुंबई येथे ‘एआय इन मॅनेजमेंट’ (AI in Management) प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करत विशेष पुरस्कार पटकावला आहे. गौरवच्या या यशामुळे संपूर्ण कोकण विभागाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
चिपळूणमधील पत्रकार संतोष सावर्डेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून गौरव सावर्डेकर याने यापूर्वी चिपळूणमधील परांजपे मोतीवले हायस्कूल येथे प्राथमिक तर नंतर महाविद्यालयीन शिक्षण डीबीजे महाविद्यालयात घेतले. तर मांडकी-पालवण येथे ऍग्रीकल्चर बिटेकची पदवी प्राप्त केली. तर आता आणखी पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि एआयसीटीई (AICTE) मान्यताप्राप्त एसव्हीआयएमएस बिजनेस स्कुल येथे पीजीडीएम पदवीचे शिक्षण घेत आहे.
ही शिक्षण संस्था आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ओळखली जाते. आगामी ‘एआय’ (Artificial Intelligence) युगासाठी आपल्या विद्यार्थ्यांना ‘फ्युचर रेडी’ करण्यासाठी महाविद्यालयाने थेट आयआयएम मुंबई सोबत हे विशेष प्रशिक्षण आयोजित केले होते.
या संधीचा फायदा घेत गौरव सावर्डेकर याने आपल्या कल्पकतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी गौरव याच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी लॉजिस्टिक्स सप्लाय चेन आणि मार्केटिंग यासारख्या विषयांवर आपले शोध निबंध आणि प्रोजेक्ट मॉडेल्स सादर केले. एसव्हीआयएमचे प्राध्यापक अयान ठाकूर यांनी गौरव सावर्डेकर याच्यासह अन्य विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पूर्वतयारी करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे सादरीकरण दर्जेदार झाले.
याबद्दल गौरव सावर्डेकरचा आयआयएमच्या प्रोफेसर पूर्णिमा सांगळे, प्रोफेसर अमित कुमार दास, प्रोफेसर रॉनी मित्रा यांनी सन्मान केला. तसेच या तीनही प्रोफेसरनी एसव्हीआयएमच्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. गौरवच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तर एसव्हीआयएमने आयआयएमच्या प्रोफेसरना धन्यवाद दिले आहेत.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
