लांजा: संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून लांजा नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांच्यासहित सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून लांजा नगरपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावतीने संपूर्ण लांजा शहरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, गटनेता योगेश कावतकर, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार तसेच नगरसेवक निधी गुरव, नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये, श्रद्धा तोडकरी, सुशीला कांबळे, सिद्धेश भोवड, प्रांजल यादव, रफिक नेवरेकर, प्रणाली तेली, नीलिमा कनावजे, वंदना काडगाळकर, साक्षी मानकर, वैभव जोईल, मनोहर बाईत, अनिल गुरव, नेहा राडये, स्विकृत नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये व सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी घेऊन नगरपंचायत परिसर व शहरातील लोकगर्दीची ठिकाणी स्वच्छता केली.
या स्वच्छता मोहिमेअंतर्गत लांजा गावचे देवस्थान श्री चव्हाटा मंदिर ते लांजा बाजारपेठ, एसटी स्टँड परिसर ते लांजा साटवली तिठा पर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत सर्व नगरसेवक आणि नगरपंचायतीचे कर्मचारी देखील उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. नागरिकानी खबरदारी घ्यावी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन यावेळी लांजाच्या नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप यांनी केले.
