म्हसळा ( प्रतिनिधी ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पंचायत समिती आणी नवनियुक्त शिक्षक वृंद यांचा वतीने पंचायत समिती कार्यालयात साजरी करण्यात आली.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी विस्तार अधिकारी दामोदर दिघीकर, चंद्रसेन चौधरी, रमेश दवटे, प्रसाद कुरळे,सचिन बोराडे, प्रमोद शिरसाठ, ज्ञानेश्वर झोल कैलास नागरगोजे, विशाल तळेकर,रमेश खोसे, सखाराम बहिर लटपटे,मुनेश्वर सर, निलेश शेळके, कृष्णा पांडुळे, गुंजकर सर, भोये सर, गायकवाड सर उपस्थीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले.छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आत्मसात केला, तर राष्ट्रासाठी भरीव आणि आदर्श कार्य करू शकू असे प्रतिपादन गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना दिले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
