पेण (प्रशांत पोतदार) : वडखळ पोलीस ठाणे हद्दीत बुर्डी गावच्या बस स्ट्रॉप समोरील रोडवर गोवा बाजुकडे जाणा-या लेनवर पेण येथे शुक्रवार सायंकाळी ब्रिझा कार नं एम एच ०६ बी यु ४६६४ ही वरील आरोपी चालक याने त्याचा ताब्यातील कार ही अतिवेगाने व बेदरकारपपणे चालवुन एल एन टी कंपनीच्या कॉलनी सालिंदे येथुन बुर्डी गावाकडे मुंबई गावाकडे मुंबई गोवा हायवे रोड क्रॉस करीत असलेले इसम दोन्ही सध्या रा एल एन टी कॉलनी सालिंदे ,पेण यांना जोरात ठोकर मारल्याने त्यांच्या डोक्याला व हातपायांना लहान मोठया स्वरूपाच्या दुखापती होवुन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघातानंतर दोघांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या अपघाताची खबर न देता वाहनचालक पळून गेल्याने वडखळ पोलिसांनी तपास सुरू करून चालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी आरोपी चालकावर
मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात एल एन टी कॉलनीतील दोघांना ब्रिझा कारने उडवल्याने जागीच मृत्यू
