पेण (प्रशांत पोतदार) : पोलीस ठाणे हद्दीतील मंगो होम्स मध्ये राहणारे विकास विठोबा खामदेकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने १५जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दागिने चोरी केले. चोरीला गेलेल्या माला मध्ये सोन्याचे व चांदीचे १,९५,००० रुपयांचे दागिने होते या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी सुमित संतोष हंकारे याला अटक करून माल हस्तगत केला आहे
तर दुसऱ्या घटनेतील फिर्यादी दिनेश मणीराम म्हात्रे यांच्या पाटणोली येथील घराचे मुख्य दरवाजाला लॉक असलेली कडी कोयंडा २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वाजता अज्ञात चोरट्याने तोडून १,५०,०००/- रुपये किमतीचे दागिने चोरी केले. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करून आरोपी सलीम उर्फ अहमद फिरोज अन्सारी, मोहम्मद शाहिद अल्लाउद्दीन खान, व शमसुद्दीन रईस कुरीशी यांचा शोध सुरू केला व चोरलेला माल हस्तगत केला आहे. यातील मुख्य आरोपी असलेला मोहम्मद शाहिद अल्लाउद्दीन खान हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे समजून येत आहे.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी नालकुल,पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच विशेष पथकाकडून करण्यात येत आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
