रसायनी : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी वाशिम -विदर्भ येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार व पदाधिकारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या राज्यस्तरीय पत्रकार संम्मेलनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, अयोध्या मंदिर कोषाध्यक्ष भागवताचार्य प.पू.रमाकांत व्यास,पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते कोकण विभाग उत्कृष्ट संघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकार राकेश खराडे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी सहकार मंत्री आकाश फुंडकर, एबिबी माझा टिव्ही वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे आदींसह विविध प्रसार वाहिन्या व वर्तमानपत्रांचे संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यातील एकूण दहा उत्कृष्ट पत्रकारांना गौरविण्यात आले.
यावेळी पत्रकारांचा डिएनए काय व अजितदादा पवार यांच्या मृत्यूचे राजकारण तर होत नाही ना? या विषयावर चर्चा सत्र होवून जेष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे यांनी सायबर युगातील माध्यमे आणि मुल्यनिष्ठ पत्रकारीता या विषयावर मार्गदर्शन केले.अधिवेशनाला राज्यातील विविध टि व्ही वाहिन्यांचे तसेच प्रिंट मिडीयाचे प्रतिनिधी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
