नागोठणे (महेश पवार) : तिथी प्रमाणे येणारी शिवजयंतीचे नागोठणे शहर व नागोठणे ग्रामीण विभागातील अनेक गावांत आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त नागोठणे शहर व ग्रामीण भागातील शिवप्रेमी नागरिक शिवज्योत आणण्यासाठी गुरुवारी(दि.५) सायंकाळी मोठ्या संख्येने रायगड किल्ल्यावर गेले होते.
रायगड किल्ल्यावर शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या नागोठणे व पळस येथील शिवप्रेमींचे शिवज्योतीसह शुक्रवारी(दि.६) सकाळी ९.३० वाजता नागोठण्यातील हायवेनाका येथे आगमन झाले. त्यानंतर ही शिवज्योत नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकाकडे जात असताना रायगड किल्ल्यावरुन शिवप्रेमींनी आणलेल्या शिवज्योतीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलिसानी यांच्या शिवराज सदन या निवासस्थानासमोर सकाळी १० वाजता आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करीत या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी गोवर्धनभाई पोलिसानी, सौ. सरस्वती गोवर्धन पोलसानी, तिरत पोलिसानी, पवन पोलसानी, सौ. संगीता पवन पोलसानी, पवित्र पोलसानी, शिवराज पोलसानी आदींसह पोलसानी परिवाराने शिवज्योतीचे स्वागत करून पूजन केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींसाठी गोवर्धनभाई पोलिसानी यांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती.
त्यानंतर ही शिवज्योत नागोठ्यातील छ. शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर येथेही उपस्थित शिवभक्तांनी फटाक्यांची आतषबाजी करत शिवज्योतीचे स्वागत केले. नंतर शिवसेनेच्या नागोठणे शाखेत छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या व शिवज्योतीच्या पुजनाने नागोठण्यातील शिवजयंतीची सुरूवात करण्यात आली.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
