उरण ( धम्मशील सावंत ) : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण केगाव या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या मानस जयेश पाटील या लहानग्याने सलग १७ किमी सागरी अंतर कापून आज एक नवा विश्वविक्रम केला आहे. आय ई ए बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये मानस पाटील याची नोंद झाली आहे.
गेटवे टर्मिनल्स इंडिया (GTI) च्या सहकार्याने, GTI कर्मचारी जयेश पाटील यांचा मुलगा, 6 वर्षीय मास्टर मानस जयेश पाटील याने 6 मार्च 2026 रोजी केगाव नागाव ते JNPA लँडिंग जेटी पर्यंतचे 17 किमीचे यशस्वी सागरी पोहणे 4 तास 49 मिनिटे 50 सेकंदात पूर्ण केले. “सर्वात तरुण पोर्ट चॅनल क्रॉसिंग चॅनल पार करण्याचा त्याने विक्रम केला. या ऐतिहासिक प्रयत्नाला प्रसिद्ध ओपन वॉटर जलतरणपटू संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुनील पाटील, सुनिल मयेकर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सी ई ओ आय ई ए बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड
डॉ.संदीप सिंग, अरुण लाल, हेमंत श्रींगी यांनी मास्टर मानस जयेश पाटील यांना विश्वविक्रमी प्रमाणपत्र, ट्रॉफी व पदक देऊन गौरविले.
मानस पाटील यांनी रायगडची तसेच राज्याची व देशाची ख्याती जगात पोहोचवली आहे. हा रेकॉर्ड अधिकाऱ्यांनी प्रमाणित केला आहे. त्यामुळे मानस पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.