देवरुख (प्रतिनिधी ) इस्राईल, अमेरिका-इराणदरम्यानच्या युद्धामुळे हवाई वाहतूक बंद असल्याने दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील सर्व जण गुरुवारी (ता. पाच) सकाळी हैद्राबाद व बेंगलोर विमानतळावर सुखरूप परतले.व तेथून विविध वाहनाने घरी आले .
यात देवरुख मधील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे. ज्योती सप्रे. नगरसेविका श्रद्धा इंदुलकर. जितेंद्र निमकर.कृतुजा निमकर अभिषेक निमकर. मानसी निमकर.साखरप्यातील संदेश (बापू )शेट्ये. सोनम शेट्ये व अन्य चार असे सर्व आपल्या घरी परतले आहेत.तसेच चिपळूण येथील सनी व रुची जागुष्ट्ये हेही चिपळूणला परतले
दुबईत विमानसेवा बंद झाल्याने या सर्वांना हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. दुबई व केंद्र सरकारने विमान सेवेची सोय केल्यामुळे बुधवारी (ता. चार) एक जण मुंबईत 6जण हैदराबादला 6जण बेंगलोरला विमानाने आले . गुरुवारी ते घरी आले आणि कुटुंबीय, नातेवाइक. व मित्रानी आनंद व्यक्त केला.
