जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे. राज्यभरातूल शेकडो शिवसैनिक शिवनेरी दर्शनासाठी येत असतात. शिवजयंतीसाठी लाखो लोक शिवनेरी किल्ल्यावर गर्दी करतात या गर्दीमुळे शिवनेरीवर मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली. किल्ल्यावरील अंबरखाना परिसरातील अरुंद दरवाजात शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत काही शिवभक्त जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे तीन साडेतीन च्या सुमारास सुमारास अंबरखाना परिसरातील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यांच्या दरम्यान असलेल्या एका अरुंद दरवात गर्दी अवाक्याबाहेर झाली. शिवभक्तांचा ओघ वाढला होता. जागा अरुंद असल्याने आणि लोकांची संख्या प्रमाणाबाहेर गेल्याने एकमेकांना ढकलाढकली सुरू झाली अन् चेंगराचेंगरीची स्थिती झाली. अशी माहिती एस पी संदीपसिंह गिल यांनी दिली.