मुंबई : दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींचे वार्तांकन करणारे पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन संस्थेच्या दोन ॲम्बुलंन्स चे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय… विधान भवन प्रांगणात हा लोकार्पण सोहळा पार पडला… आर बी जी फाऊंडेशन संस्थेच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांच्या सहकार्यामुळे या दोन ॲम्बुलंन्स मीडिया प्रतिनिधींच्या आरोग्यासाठी TVJA संस्थेला देण्यात आल्या आहेत… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या लोकार्पण कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, परीवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोहीयो मंत्री भरतशेठ गोगावले हे देखील होते. TVJA संस्थेचे अध्यक्ष उदय जाधव, महासचिव पंकज दळवी, कार्यकारिणी सदस्य मनश्री पाठक, मनाली गायकवाड, राजेश साफळे, अनिल सौंदडे तसेच विधान भवनातील मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻