कर्जत प्रतिनिधी
टाटा कंपनीच्या आंध्रा धरणाचे पाणी कर्जत तालुक्यातून वाहताना उल्हास नदी मधून ठाणे जिल्ह्यात जाते.धरणाचे पाणी पेज नदी मधून आणि नंतर उल्हास नदी मधून वाहत जाते.त्यामुळे कर्जत शहराच्या मधून वाहणारी उल्हास नदीमध्ये सांडपाणी वाहत जाते आणि त्यामुळे हि नदी प्रदूषित होते. त्यांचा फटका जानेवारी महिन्यापासून बसण्यास सुरुवात होते आणि आता उल्हास नदीचे पाणी हिरवेगार बनले आहे.दरम्यान, पाण्यावर बसणारा हिरवा तवंग दिसून येऊ लागला आहे.त्यांचा परिणाम त्या पाण्याला खाज येत असून त्या दूषित पाण्यामुळे आजार होण्याची शक्यता बळावली आहे.
कर्जत येथून खऱ्या अर्थाने उल्हासनदीला सध्या जलपर्णीचा विळखा बसला आहे.तेथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी उल्हास नदीत जमा झालीआहे.
या जलपर्णी मे महिन्यातून उल्हासनदीच्या पाण्यातून वाहत जाताना अनेकदा दिसायचं.मात्र मागील दोन वर्षांपासून उल्हासनदीमध्ये जलपर्णी या जानेवारी महिन्यापासून पाण्यात वाहत जाताना दिसत आहेत. त्यामुळे उल्हास नदीचे पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या अर्धा कर्जत तालुका आणि पुढे ठाणे जिल्ह्यातील कल्याण पर्यंतचा भाग या पाण्यावर अवलम्बुन आहे. ते सर्व लोक पिण्याचे पाणी वापरतात आणि त्यामुळे या दूषित हिरव्यागार पाण्यामुळे सर्वांच्या पोटात धस्स झाले आहे.त्यामुळे नदीमध्ये पोहायला जाणारे यांची संख्या कमी झाली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र हि समस्या केवळ कर्जत शहरातील सांडपाणी उल्हासनदीमध्ये सोडल्यामुळे निर्माण झालेली नाही. तर गेल्या काही वर्षात सातत्याने नागरीकरण झालेल्या नेरळ शहर वजा गावातून असलेल्या रहिवाशी भागातील सांडपाणी देखील माथेरानच्या डोंगरातून पावसाळ्यात पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात सोडले आहे.तो नाला पुढे उल्हासनदीला जाऊन मिळतो .
त्यामुळे कर्जत नंतर उल्हासनदी मध्ये नदीचे पाणी प्रदूषित करणारे जलपर्णी यांचे उगम हे नेरळ गावातून देखील झाले आहे. ते सांडपाणी येथे उल्हासनदीमध्ये गेल्यानंतर जलपर्णी यांच्या संख्येने वाढ होते. हि समस्या केवळ सांडपाण्यामुळे निर्माण झाली असल्याचे सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्राचे नदीचे पाणी मुंबई येथे परीक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र सध्या पाण्यात डिसरणारे हिरवे तवांग यामुळे पाण्यात उतरण्याची हिम्मत सर्वसामान्य लोक करीत नाही. त्यांचे कारण म्हणजे त्या हिरव्या पाण्याला चिकटपणा असून त्याचा पर्णिमा अंगावर खाज येण्यास होत असतो.हिरवेगार तवंग बघून उल्हास नदी प्रदूषित झाली असल्याचा निष्कर्ष निघत आहे. त्याचवेळी परिवाराण प्रेमी आणि उलहस नदी जल संवर्धन समिती यांच्याकडून देखील या तवंग याबाबत विचारविनिमय सुरु झाला आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
