रसायनी (राकेश खराडे ) : लोकनेते दि. बा .पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून जो लढा गेली चार वर्षांपासून लढा सुरू आहे.या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचे नाव द्यायला हवे.

महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला नावाच्या पाठवलेल्या प्रस्तावाबाबत अजून कुठलीच सकारात्मक चर्चा नाही म्हणुन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी स्थानिक नेत्यांना व मंत्रिमंडळाला सांगण्यासाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. लवकरच मोठया आंदोलनाची तयारी चालू आहे व पुढील नियोजन लवकरच घेण्यात येईल असे आझाद मैदानात कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील,भूमिपुत्र नेते व लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे,कृती समिती सदस्य व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संतोष घरत , पनवेल उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी बोलताना सांगितले.यावेळी कृती समितीमधील अन्य सदस्य व मुंबई ,रायगड मधून आलेले सर्व आगरी कोळी बांधव व सर्व समाजबांधव उपस्थित होते .

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH