पोलादपूर (शैलेश पालकर)- ऊर्जा ही सकारात्मक असते आणि नकारात्मक असते. मात्र,’वीआरमोर’कंपनीमार्फत काम करताना मिळणारी ऊर्जा ही सकारात्मक असल्याचे सभागृहातील माता भगिनी यांच्या चेहऱ्यावरील आनंद सांगत आहे, असे मनोगत संतोष जुवेकर यांनी वाशी येथील एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित ‘वीआरमोर’ कंपनीच्या सहाव्या स्नेहसंमेलन वर्धापन दिनी बोलताना व्यक्त केले. यावेळी पोलादपूरमध्ये शिक्षण झालेल्या ‘वीआरमोर’ कंपनीचे चेअरमन विकास गोपाळ यांच्या उद्योजकतेची छाप सर्वत्र कौतुकास पात्र ठरत असल्याचे दिसून आले.
याप्रसंगी गुरुदेव विनोद सुवर्णा, अभिनेत्री वनिता खरात, अभिनेता संतोष जुवेकर, डॉ. धनंजय पाटील, चंद्रकांत पाटील, ‘वीआरमोर’ कंपनीचे चेअरमन विकास गोपाळ, डायरेक्टर प्रिया कड, दिनेश शिंदे, संदीप भालेकर, संजय लाड, ऍंकर किरण खोत यांच्यासह सुमारे महाराष्ट्रातून पाच हजारांपेक्षा जास्त महिला सदस्य उपस्थित होत्या.
महिला सबलीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र बाहेर सुध्दा ‘वीआरमोर’ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्रो विंग्स च्या माध्यमातून लाखो महिलांना जोडून एक परिवार उभा केला आहे. ‘वीआरमोर’मध्ये काम करणे म्हणजे स्वप्नपूर्ती करणे, ही कंपनी बिजनेससाठी नाहीतर कुटुंब आणि मोठा परिवार तयार झाला आहे. ‘वीआरमोर’या कंपनीचे सर्वेसर्वा विकास गोपाळ व डायरेक्टर प्रिया कड यांनी कुटूंबवत्सल महिलांसाठी मोठा प्लॅटफॉर्म तयार केला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई कार्याध्यक्ष तथा ट्रस्टी सिध्दिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी मनीषा तुपे यांनी केले.
यावेळी ‘वीआरमोर’कंपनीत काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटर्स मानसी पात्याने, शाहीन काझी, राजनंदनी आंद्रे आदी महिलांनी मनोगत व्यक्त करताना सर्वसामान्य कुटुंबातील महिला गृहिणी असताना ‘वीआरमोर’ कंपनीत सामील झाल्यानंतर लखपती ते करोडोच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा आनंद व्यक्त केला.
‘वीआरमोर’च्या बेमिसाल छह साल निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या एक हजार महिलांचा कंपनीतर्फे सन्मान करण्यात आला. या महिला सभासदांना फोर व्हीलर, 30 स्कुटी, आयफोन, स्मार्टफोन, मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रिज, कुलर अशा गृहपयोगी वस्तूंचे मान्यवरांच्याहस्ते वाटप करण्यात आले.