साखळोली : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय दापोलीच्या कृषी विस्तार शिक्षण विभाग आणि विद्यार्थीनींच्या संजीवनी व कृषी संगीणी गटांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म व दैनंदिन आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित रानमाया प्रदर्शन व पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ शामल लांजेकऱ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमास कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर , कृषी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ . संतोष वरवडेकर , रावे कार्यक्रम समन्वयक डॉ.अशोककुमार चव्हाण, विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे , डॉ. महेंद्र पालशेतकर, डॉ.रणजित महाडीक, सरपंच सौ.शामल लांजेकऱ, गाव अध्यक्ष श्री.महादेव मेंगे ,कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे आणि डॉ.आशिष शिगवण यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करून सहभागी महिलांचे अभिनंदन केले.
प्रदर्शनात जवळपास ४० रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले. प्रत्येक रानभाजीचा उपयुक्त भाग ,आढळ, औषधी गुणधर्म यांची माहिती देण्यात आली.
पाककला स्पर्धेत ३१ महिलांनी सहभाग घेत ५० हून अधिक विविध रानभाजीजन्य पदार्थ सादर केले. परीक्षकांनी पदार्थांचे परीक्षण करून उत्कृष्ट पदार्थांची निवड केली.स्पर्धेचा निकाल डॉ. प्रविण झगडे सर यांनी जाहीर केला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक: सौ.स्मिता पडवेकर (केळीच्या कोक्याचे मोदक)
द्वितीय क्रमांक : प्रणाली हरचिलकर (भरंगी ची पानावडी)
तृतीय क्रमांक: मयुरी रामाने (भरंगी वाडी)
उत्तेजनार्थ: ऋषिका जामसुदकर (टाकळ्याचे लाॅलीपॉप) ह्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी महिलांना सफेद वेलची या केळीच्या जातीचे रोप देण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण झगडे सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
‘रानमाया’ प्रदर्शन व पाककृती स्पर्धेमुळे पारंपरिक अन्नसंस्कृतीबाबत नवचैतन्य निर्माण झाले असून, शिवाजीनगर ग्रामस्थामध्ये या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, कृषी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय तज्ञ डॉ. महेश कुलकर्णी आणि डॉ. रणजित महाडिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होणेकरीता श्री समीर उसरे, श्रीयश पवार, चंद्रकांत साळवी आणि संजीवनी व कृषी संगीनी गटाच्या सर्व कृषी कन्यानी विशेष मेहनत घेतली.
