मुंबई : पुस्तक महोत्सवात माजी नौदल अधिकारी आणि लेखक कुलप्रीत यादव यांनी 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात हाजीपीर दरेंवर मिळवलेला ऐतिहासिक विजय ताश्कंद करारामुळे गमावल्याची खंत व्यक्त केली.

भारतीय सैनिकांनी अदम्य शौर्य दाखवत पाकिस्तानच्या ताब्यात असलेला हा महत्त्वपूर्ण रणनीतिक ठिकाणा मुक्त केला होता. मात्र, जानेवारी 1966 मध्ये झालेल्या ताश्कंद करारानुसार हा भाग पुन्हा पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आला. सैनिकांच्या बलिदानातून मिळवलेला विजय अशा प्रकारे हातातून निसटणे निराशाजनक होते, असे यादव यांनी सांगितले.

यादव यांनी आपल्या ‘द बॅटल ऑफ हाजीपीर’ या पुस्तकात या लष्करी मोहिमेचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांनी सांगितले की, ऑगस्ट 1965 मध्ये ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत सुमारे 30 हजार पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती.

याला प्रत्युत्तर देताना मेजर रणजीत सिंह दयाल यांच्या नेतृत्वाखालील 1 पॅरा बटालियनने दुर्गम डोंगररांगा आणि नद्या पार करत हाजीपीर दर्र्यावर कब्जा केला. या मोहिमेत शीख, डोगरा, जाट आणि अहीर समाजातील सैनिकांनी सहभाग घेतला होता.

हाजीपीरच्या लढाईतील शौर्य, रणनीती आणि सैनिकांच्या बलिदानाची कहाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आपल्या पुस्तकाची निर्मिती केल्याचे यादव यांनी सांगितले.