मुंबई – मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आज आमदार झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची निवड झाल्यानंतर आज त्यांनी मुंबई अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार सना मलिक-शेख, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी आदींसह पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.