मंडणगड : मंडणगड शहरीतील सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात एका वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंडणगड ते पाटरोड मार्गावर आरोपीत डुंगरसिंह जामतसिंह दैय्या (वय २८, रा. गणसोली, नवी मुंबई, ठाणे) याने त्याच्या ताब्यातील इको गाडी (क्रमांक MH-06-CU-3583) सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे उभी केली की, त्यामुळे रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी संबंधितदास प्रताप मावची पोहेकॉ/१५५८, वय ३७, मंडणगड पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ नोव्हेंबर रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.