चिपळूण (विशेष प्रतिनिधी)- तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेली मुलगी मुंबईच्या अंधेरी भागात पोलिसांना सापडली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ती मुलगी आणि तिच्यासोबत असलेला युवक या दोघांनाही ताब्यात घेऊन चिपळूणला आणले असल्याचे वृत्त पोलीस सूत्रांनी दिले. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यामुळे याबाबतची महत्त्वाची अपडेट वरिष्ठ पोलीस अधिकारी देतील, असेही या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांची पालकमंत्री डॉ. उदय सामंत सावर्ड्यात भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
‘ती’ सापडली – पोलीस देणार महत्त्वाची अपडेट…
