चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिपळूण तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी मुंढे येथील युवा कार्यकर्ते श्री. शिवराज विजय शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे विचार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात पक्ष संघटनेची बांधणी जोमाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीपत्र चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन (आबू) चंद्रकांत ठसाळे यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदान केले. दरम्यान, आमदार शेखर निकम यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वतंत्र पत्राद्वारे शिवराज शिर्के यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
“आपण ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून विद्यार्थ्यांचे संघटन मजबूत कराल, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहाल आणि पक्षाची ध्येयधोरणे युवकांपर्यंत पोहोचवाल, असा मला विश्वास आहे. आपल्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!” अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन (बाबूशेठ) ठसाळे, प्रदेश सरचिटणीस जयंत शेठ खताते, पंचायत समिती सभापती सूर्यकांतजी खेतले, ज्येष्ठ नेते दादासाहेब साळवी, पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, युवकांचे मार्गदर्शक मयूरजी खेतले, निलेशजी कोलगे, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, श्यामभाई खेतले, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजयराव गुजर, पांडूशेठ माळी, जयवंतराव शिंदे, राजेश चव्हाण, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, गणेश साबळे, रुपेश खेतले, प्रशांत कांबळी, समीर शिंदे, रुचिताज भागडे, विशाल निचोरे, सुशांत कांबळी, नितीन शिर्के, साजन शिर्के, सनी शिर्के, निलेश साटले, संकेत गायकवाड, रितेश शिंदे, रोहन शिंदे, अजय शिर्के, वंश शिर्के, मनोज साटले, प्रफुल खेतले, तेजस पवार, नुमान खान, अमीर कुटरेकर, अक्षय शिंदे, शुभम चव्हाण आणि शुभम साटले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त अध्यक्ष शिवराज शिर्के यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष शिवराज शिर्के म्हणाले, “पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ नेत्यांचा व माझ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”
