चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचे कार्य सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या नव्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक या बँकेचे अध्यक्ष तथा आमदार आणि भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे कौतुक केले. आज दुपारी आमदार भोसले यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन येथे पतसंस्थेचे कर्मचारी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सौ. स्वप्ना यादव यांचे नेतृत्व देखील वाखाणण्यासारखे आहे, असे सांगत आमदार भोसले यांनी स्वप्ना यादव यांचेही कौतुक केले.

यावेळी भाजपाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, उपाध्यक्ष अशोक साबळे, कृष्णा सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि संचालक शिवाजीराव थोरात, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भाजपा चिपळूण ग्रामीण मंडळ प्रभारी सौ. स्वप्ना यादव, तज्ज्ञ संचालिका ॲड्. नयना पवार, संचालक सोमा गुडेकर, रविंद्र भोसले, सत्यवान म्हामुणकर, चिपळूण पालिकेतील भाजपचे गटनेते शशिकांत मोदी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, भाजपच्या चिपळूण शहर महिला मोर्चा अध्यक्ष रुही खेडेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सुभाषराव चव्हाण यांनी तर भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या वतीने प्रशांत यादव यांनी आमदार भोसले यांचा यथोचित सन्मान केला.