चिपळूण : कृष्णा सहकारी बँक लि., रेठरे बुद्रुक या बँकेचे अध्यक्ष तथा आमदार आणि भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तसेच भाजपचे चिपळूण ग्रामीण प्रभारी स्वप्ना यादव यांनी आमदार भोसले यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार भोसले यांनी वाशिष्ठी प्रकल्पाची माहिती घेतली. तसेच, प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीबद्दल प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांचे कौतुक केले. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, डेअरीचे जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, मॅनेजर अनुप बनकर, मॅनेजर विजयकुमार हाके, मार्केटिंग मॅनेजर राजदीप पाटील, अकाउंट मॅनेजर विजय वाजे आदी उपस्थित होते.
