खेड : – तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील कन्साई नेरोलॅक कंपनीतील कामगार संतोष सखाराम जाधव (४९ , रा.आवाशी – ताम्हणवाडी ) याची कंपनीत काम करीत असताना अचानक तब्बेत बिघडल्याने त्याला जवळील घाणेखुंट येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. हि घटना सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०१:४५ वाजताच्या सुमारास घडली.
या दुर्दैवी घटनेची खबर संतोष दौलत सावंत यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.