खेड :- येथील कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डाॅ. सुहास हळदीपुरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी पाटीदार भवन येथे झालेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात ४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली, १२ रुग्णांच्या डोळ्यांची मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. आतापर्यंत ४,५०० रुग्णांनी सहभाग घेतला, तर १२०० रुग्णांच्या मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. अशाप्रकारे नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. ही मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम राबवत असल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मनोज पटेल,रमेश पटेल,मेहुल पटेल, प्रकाश जोयसर, विनोद जोयसर, प्रकाश पटेल आदिंनी अथक परिश्रम घेतले.