चिपळूण : तालुक्यातील कादवड गावच्या डॉ. नम्रता सावंत यांच्या देवता क्लिनिकला आलोरे जि. प. सदस्य सौ. विनया विनोद झगडे व पिंपळी खुर्दच्या पं. स. सदस्य सौ सुप्रिया देवरुखकर यांनी आज गुरुवार दि. 10 सप्टें. रोजी सदिच्छा भेट दिली.

 यावेळी जि.प.सदस्य सौ. झगडे यांनी डॉ. सौ. नम्रता सावंत यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल बोलताना गौरवोदगार काढले. गोरगरीब जनतेला चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सेवा द्यावी अशी आशा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना महिला तालुखाप्रमुख शिंदे गट सौ सुप्रिया सुर्वे, पं. स. सदस्य श्री. विनोद झगडे, पेढाबे शिवसेना विभाग प्रमुख श्री जयवंतराव शिंदे, नवनिर्वाचित कादवड तंटामुक्ती अध्यक्ष सौ शिल्पा शिंदे, रिक्टोली पोलीस पाटील श्री विजयराव शिंदे, आकले भाजपचे युवा कार्यकर्ते श्री जतीन शेट्ये, श्रीम. शिंदे आई आदी उपस्थित होते.तसेच पत्रकार डॉ सुनील सावंत यांनी सगळ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला..