लांजा: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र.या संस्थेच्या माध्यमातून मला कोकणातील तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी मला भर घालायचा आहे.ती मुले उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी होऊन कोकणाचे नाव उज्ज्वल झाले पाहिजे.तसेच आमचे जिजाऊ रुग्णालयात पालघर,ठाणे, रत्नागिरी या ठिकाणी भव्य दिव्य असे रुग्णालय आहे.या ठिकाणी कोणत्याही रुग्णांना कोणताही आजार असो तो बरा होण्यासाठी मोफत सेवा केली जाते.तिथे कोणाकडूनही पैसा घेतला जात नाही.
तसेच जिजाऊ शैक्षणिक संस्था आहेत या ठिकाणी विविध शिक्षणाचे कोर्सेस आहेत त्याही मोफत दिल्या जातात फी घेतली जात नाही. शिवण कल्लास विविध प्रकारचे शिकवले जात आहेत.ज्यांच्या मुलांना शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बणायचे आहे पण आर्थिक अडचण असेल तर त्यांच्या पाठी जिजाऊ संस्था उभी राहिल तसेच ज्या मुलांना आई वडील नसतील पण शिक्षण घेण्याची इच्छा आहे,पर्धा परीक्षात मुलांनी जास्त लक्ष घ्यावे, ज्या मुलांना मोलमजुरी करतात त्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावेत ते मला बगायचे मी आमदार खासदार नाही. तरूण तरूणी यांना रोजगार कसा मिळेल या साठी जिजाऊ संस्था काम बघत आहे. मुलांची स्वप्न मोठी आहेत त्यांनी ध्येय गाठण्यासाठी पुढे यावे.मोबाईल पासून दुर राहावे. ज्यांना शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जावे लागेल त्यासाठी जिजाऊ संस्था उभी राहील . पालघर गावात २००लोकांची वस्ती नाही .पण दोन लाखांवर रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थापक निलेश सांबरे यांनी संतोष आग्रे यांच्या गणेश मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात भाषणात बोलताना म्हणाले.
या कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रथिमेला दिपप्रज्वलन व पुष्पहार घालून करण्यात आली. सुत्रसंचलन अमर राऊत यांनी केले. या कार्यक्रमात दहावी बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या २१० मुलांचा प्रशिस्त पत्र व भिंतीवरचे घड्याळ देऊन गौरविण्यात आले .या कार्यक्रमात मान्यवर तहसीलदार प्रियांका ढोले, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, नगराध्यक्ष सावली कुरूप, माजी आमदार राजन साळवी,राजन देसाई , पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे,भाऊ वंजारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.