चिपळूण : सर्वसमावेशक आणि प्रगतीपथावर असलेल्या दि चिपळूण अर्बन को-ऑप बँकेने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. मा. संचालक मंडळातील सर्व सदस्य आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुषार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सर्व कर्मचारीवर्गाने घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे बँकेने ८०० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे.

अध्यक्षांच्या कालावधीत ३१४ कोटींची विक्रमी व्यवसाय वाढ
बँकेचे मा. अध्यक्ष श्री. मोहनशेठ मिरगल यांच्या यशस्वी कार्यकाळात बँकेच्या व्यवसायात तब्बल ३१४ कोटी रुपयांची विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने ही उल्लेखनीय मजल मारली आहे.

सहकार आणि टीमवर्कचे यश
हे यश मिळवण्यात बँकेचे अध्यक्ष श्री. मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष श्री. धनंजय खातू, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ऍड. श्री. दिलीप उर्फ भाऊ दळी तसेच संचालक मंडळातील सर्व सहकार्यांनी एकजुटीने केलेल्या उत्कृष्ट कामाचे मोठे योगदान आहे.

सर्वांचे मानले आभार व अभिनंदन
या ऐतिहासिक यशाबद्दल बँकेचे आजी-माजी संचालक, आजी-माजी कर्मचारी, सर्व सभासद आणि आदरणीय ग्राहक वर्ग यांचेमनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत.