चिपळूण : फलाहे दारेन एज्युकेशन सोसायटी संचलित अली पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चिपळूण येथील विद्यार्थी उजेर जैनुद्दीन तांबे याने आंतरराष्ट्रीय तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

उजेरच्या या यशाबद्दल फलाहे दारेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ज. दाऊद कुंदे, कार्याध्यक्ष ज. खालिद परकार, उप-कार्याध्यक्ष ज. नाझीम अफवारे, सचिव ज. हारून धामस्कर व इतर सदस्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच भविष्यातही त्याने अधिक मोठे यश मिळवावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.