दापोली : १९३६ पासून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.’ या संस्थेच्या नवीन दापोली शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. दापोलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पोस्ट गल्ली) येथील वरुण अम्पायर, ‘बी’ विंग, शॉप नंबर ९ येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या शाखेचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे गटनेते, मुंबई बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष ना. प्रविणभाऊ दरेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास राज्याचे गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक व मुंबई बँकेचे संचालक प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक संदीप चंद्रकांत सुर्वे, मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका व मुंबई बँकेच्या संचालिका तेजस्वी घोसाळकर, दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा घाग, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दीपक पटवर्धन हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच भाजप नेते वैभव खेडेकर, मुंबई बँकेचे संचालक विनायक (बंटी) म्हशिलकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजप नेते केदार साठे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर कालेकर, उद्योजक सदानंद कदम, मनसे नेते सचिन गायकवाड, मुंबई बँकेचे संचालक भारत थोरात आणि दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे हे देखील कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवणार आहेत.
दापोली व परिसरातील नागरिक, सभासद आणि खातेदारांनी या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे निमंत्रण संस्थेचे अध्यक्ष राजेश येरुणकर, संचालक डॉ. यश प्रविण दरेकर, प्रसाद कर्वे आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.