खेड : – तालुक्यातील कळंबणी येथील कामाक्षी पेट्रोलपंपाजवळ सीएनजी टँकर क्रमांक एमएच 14 JL 5201 ला गणपतीपुळे येथुन नाशिक सिन्नर येथे जाणा-या कार क्रमांक एमएच 48 W 7093 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सीएनजी टँकरला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी १५ मे रोजी रात्री १२:३० च्या सुमारास घडला.
या अपघातात शैलेश जयसिंग गुरव (वय 36 रा. अरवली), सौ. पुजा सुमित गांगुर्डे (वय 23 रा. नाशिक सिन्नर)या दोघांना दुखापत झाली असून जखमींना नरेंद्राचार्य नाणीजधाम 24 तास रुग्णवाहीकेने कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.