मुंबई : MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर आहे.,“मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. MPSC विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला पाहिजे. यंत्रणेत सुधारणा झाली पाहिजे. परीक्षा जगात होतात. आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत?,उलट AI मध्ये बारामती, सातारा, सांगलीचा शेतकरी उतरला आहे. महाराष्ट्राच्या परीक्षांमध्ये या तंत्रज्ञानाचा का वापर होत नाही? असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,मुख्यमंत्री नवी मुंबईत आहेत, चॅनलवाले लाईव्ह आहेत तिथे. तुम्ही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री देऊ शकतील,MPSC, UPSC च्या मुलांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. सगळे आंदोलन करतायत. महागाई, भ्रष्टाचार, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी अडचणीत आहे. एवढी मोठी आव्हानं राज्यासमोर आहेत. महत्वाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाशी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे.आमच्या काळातही शेतकरी आत्महत्या झाल्या,मात्र त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घेऊन आदरणीय शरद पवार साहेब यांनी ७० हजार कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी दिली,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करावी,गणपती राया, सरकारला सुबुद्धी दे आणि यांच्या सगळ्यांच्या गाड्या वळून दुष्काळग्रस्त ठिकाणी जाऊ देत आणि सरसकट कर्जमाफी मिळू दे,असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकारा आहे,प्रत्येकाच्या भावना असतील, त्याचा सन्मान केला पाहिजे. आपण ऐकण्याची ताकद ठेवली पाहिजे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो आणि १६ तारखेला पक्षाची बैठक असून नवीन प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा होईल,रोहित पवार यांना अस्वस्थ वाटत असेल तर त्यांच्या भावनांचे स्वागत केले पाहिजे,दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने केंद्राशी संबंधित महत्त्वाचे कार्यक्रम दिल्लीत होणे आवश्यक आहे,असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,राऊत साहेब राज्याचे नाही तर देशातील मोठे नेते आहेत. मी ठरवलेलं या विषयावर बोलणार नाही. तुम्हाला या विषयावर काहीही विचारायचं असेल तर या बद्दल सरकारला विचारलं पाहिजे. मी या विषयावर बोलणार नाही. मी या विषयावर बोललेलं लोकांना आवडत नाही. मला कोणाच्या भावनेचा अनादर करण्याची इच्छा नव्हती. मी अंतःकरणाने बोलली होते.लोकांना आवडत नसेल तर मी बोलणार नाही. सरकारमध्ये जे लोक आहेत, त्यांना प्रश्न विचारा,असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,मला एका महिलेचा रात्री रडत फोन आला. ती MPSC च्या परीक्षेमुळे निराश झाली होती. ती आत्महत्येच्या विचारात होती. मी एक नागरिक म्हणून पोलिसांना स्क्रिनशॉट पाठवला. आज सकाळी मला पोलिसांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की, आम्ही त्या महिलेला समजावलय. ही रात्री 12.30 ची घटना आहे. अशी एक केस नाही, सगळीकडे अशी परिस्थिती आहे. मुलं कष्ट करुन मेरिटवर पास होण्याचा प्रयत्न करतायत. यात चूक यंत्रणेची आहे,असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरकार असताना अजितदादा यांनी गुटखाबंदी केली होती. मात्र त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल,देशासमोर काय प्रश्न आहेत आणि तुमचं काय चाललं आहे?, महागाईच्या काळात नागरिकांच्या खाण्यापिण्यावर निर्बंध,संविधान आणि बोर्डाच्या नियमांच्या विरोधात अशा प्रकारच्या सूचना असतील तर त्या धक्कादायक,असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.