चिपळूण : येथील प्रथितयश वकील अँड विश्वजीत मनोहर यादव यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी अँड. विश्वजीत यादव यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीशराव मोरे, विधान परिषदेचे आमदार अँड. निरंजन डावखरे, विधान परिषदेचे आमदार श्री. प्रमोद जठार तसेच माजी आमदार डॉ. विनय नातू उपस्थित होते.
अँड. विश्वजीत यादव यांच्या भाजप प्रवेशामुळे चिपळूणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
